STORYMIRROR

Ranjeeta Govekar

Others

3  

Ranjeeta Govekar

Others

अजूनी

अजूनी

1 min
259

अजूनी या पाखराला 

ओढ धरणीची आहे 

झेप उंच आकाशात 

नाळ माती संगे आहे 


सांज होता घरट्यात

परतणे नसे मला 

पिल्ले उडून गेलेली 

आता.... नसे घरटेची मला


माझे घरटे आभाळ

माझ्या पंखांवर असे 

अजून या पाखराला 

स्वप्न आभाळाचेच दिसे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन