आपलं असावं
आपलं असावं
1 min
263
पुसणारं असावं
हसवणारं असावं
हळुवार आपल्यावर
रुसणारं असावं
बघणारं असावं
रागावणारंही असावं
कुणीतरी आपल्यावर
प्रेम करणार असावं
ग्रीष्माच्या उन्हात
सावली देणारं
पावसाच्या सरीसंगे
सोबत भिजणारंही असावं
मनातल्या वेदनांवर
फुंकर घालणारं
आणि मनाच्या सौंदर्यावर
मनापासून भाळणारं असावं
हसवणारं असावं
रडवणारं असावं
कुणीतरी आपलं
आपलंच असावं
