आठवांचा हा कल्लोळ
आठवांचा हा कल्लोळ


अडखळणाऱ्या पावलांनी
धडधडणाऱ्या हृदयाने
बावरलेल्या स्पर्शांनी
मुक्या वेड्या प्रीतीने
चंग बांधला जणू मनाने
आठवणींच्या आठवणींना आठवण्याचा
तुझ्या आठवांचा हा कल्लोळ उठता
क्षणाक्षणाने पडतो पाऊस आसवांचा
भिजलेले अश्रू लपवती डोळे
तुला कधी ते कळतील का रे....?
तडफड या हृदयाची जैसी
तुझीही अवस्था तशीच का रे....?
माझ्या उरी उठतो जसा रे
तुझ्या उरीही उठतो का रे....?
आठवांचे कल्लोळ तुझे जसे
मनी तुझ्या मी रुजले का रे....?