आठवणींच्या साठवणं
आठवणींच्या साठवणं
1 min
313
आठवणींच्या साठवणींच गाठोड
मी जपून ठेवलय एका कोपर्यात
सहसा दिसूनही देत नाही कुणा
खजिनाच दडवलाय हर क्षणात....
मी मात्र...
गुपचुप रोज तिथेच जाते...
जगण्यातल जगण माझं
परत परत जगुन येते...
खारट पाणीही नकळत
पापणीमागून वाहत मग...
माझ्या चेहर्यावरचा मुखवटा
अगदी सहजच सरतो मग...
माझी मलाच मी सापडते तेव्हा
आठवणींच्या कुशीत शिरते जेव्हा जेव्हा
मग सावरते स्वत:
अन आवरतेही पसारा आठवांचा....
बंद डोळ्यांमागे लपवलेला
माझा खजिना आसवांचा....
आहेत रेशमी वस्त्र
सोबत लक्तरही ठेवलीत जपून
जमिनीवरचं रहा सदा
तिचं सांगतात मला ठासून...
