केवडा
केवडा
1 min
493
काळजात जपून ठेवलेला
तुझ्याच केवड्याचा गंध
अजूनही गंधित करतो श्वासांना
आणि होते मन हे बेभान बेधुंद....
कळले नसेल तुला ही तेव्हा
वळले नसेल मलाही तेव्हा
काय सांडून गेलो आपण
एकमेकांना सोडले जेव्हा....
तुझ्या अस्तित्वाच्या खुणा प्रिये
विखुरल्यात माझा हृदय कोंदणात
आणि... तो केवडा तर लबाड
श्वासच होऊन वाहतो या देहात....
काळजाचा भागच काय सखे
तु माझ काळीजच बनलीस
केवडा बनून तूच कायमची
या खोल हृदयातच वसलीस.....
