अंतरीची साद
अंतरीची साद
तुझ्या अंतरीची साद। तुझ्या अंतरीचा नाद॥
ऐकूनी जो घेई। जगी सुखी आज॥१॥
जाणीवा घेणिवा। मोह आणि माया॥
देव अंतरी जागता। लागे सोडूनी या जाया॥२॥
तुझ्यातला देव। तुझ्यातच वसे॥
चराचरात दिसता॥ देव डोळ्यातून हसे॥३॥
श्वासांचे वाहने। मनाचे धावणे॥
वाळू मुठीत धरता। न थांबे वेळेचे पळणे॥४॥
एक जन्मची आपुला। असे जन्मोजन्मी वाटे॥
जग सोडून जाताना। अश्रू डोळ्यात का दाटे॥५॥
वस्त्र फाटले देहाचे। नवे मिळणार आत्ता॥
नको रडू ना उगाच। आहे अमरच आत्मा॥६॥