मला बी जगायचआहे...
मला बी जगायचआहे...
आभाळामंदी येत नाय
पर... उरात भरुन येतोय.....
टिपुर सुदिक गळत नाय,
पर.... काळिज फाडुन वाहतोय........
भेगाळलेली माय माझी
काळीज भेगाळलेल...
पान्यासाठी कासाविस ती
पर..... नशिबच पालाटलेल.......
आटलेली ओढि जशी
गड्या....
मानसाच मनबी मेलेल,
कुत्रासारख मरान आमच
पर..... तुमच मन झोपलेल........
तुमच्याकड गड्या आता
दिवाली साजरी होेईल...
पोटामंदली आग आमची
पर... सरनावर शांत होईल.....
होळी येईल पोळी देईल
गड्या गोडधोड तू खाशिल
पर..... एका एका तुकड्यासाठी
पोर माझी रस्त्यावरती येतिल......
सांगनार.....गड्या
तुबी मानुस.... मीबी मानुसच ना...?
पर फरक का असा होतोय......
तुझ्यासाठी अन्न पिकवणारा
आज उपाशिच का निजतोय......?
न्हाय.....
तु सुखी रहाच गड्या
माझ्या मनात परी द्वेश नाय
नाळ आपली एकच गड्या
धरणी आपली आहे माय........
मलाबी जगायचय गड्या
हात तुझा देशिल ना........?
जमिनिशिहि नाळ बांधली
भावा जिवदान तू देशिल ना........?
