क्षणोक्षणी
क्षणोक्षणी


क्षणोक्षणी श्वासागणी
असतेस तू काळजात माझ्या साजणी
माझ्याविना न तू वेगळी
तुझ्याविना मी न आगळा
भास होई तुझा मला दरेक क्षणी!
नसता आसपास तू
होतो मी वेडापिसा
बावरतो शोधतो घेतो मी कानोसा
आठवतो क्षण तुझ्या सहवासातले
आणि हसतो मनोमनी!
ठेवू दे नावे लोकांना
त्यांचे काय जाते?
तू आणि मी दोघे करुया
दृढ आपुले नाते
तूही शोधतेस ना
मला क्षणोक्षणी!