क्षितीजापार
क्षितीजापार


क्षितीजापार चूल मूलाच्या भिंती केल्यास सखे पार ज्ञानार्जन करुनी गेलीस क्षितीपार ज्ञानाने बदलला दृष्टिकोन जीवनी पदे श्रेष्ठता मान समतेच्या अंगणी क्षेत्रे सर्वच खुली केलीस कतृत्वाने पाणबुडीपासुनी अथांग नभाकडे कर्तृत्वाला बंधन कधीच ना राहिले सर्व क्षेत्रात नाव अग्रक्रमी राहिले अशीच ध्येयासक्ती राहो जीवनपथी गगनी क्षितीपार कीर्ती निनादो तुझी ........................... सौ. मनीषा आवेकर पुणे फोन 9763706200 ............................