STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

कशी झाली फजिती

कशी झाली फजिती

1 min
176

बलरामला आली लहर

अहो त्याने केला हो कहर

दोन बायका फजिती ऐका

परस्त्रीवर वक्र नजर  (१)


चक्क पळून गेला शहरी

लॉजवर राहे बादशाही

अळिमिळी गुपचिळी सारी

आयतं जेवण विश्रामही (२)


"जाईल कसा बघतेच मी"

कंबर कसली बायकोनी

शोधला लॉज हिकमतीनी

रुमपाशी कैदाशिणीवाणी (३)


अंगावर धावे वसकन्

झिंज्याच ओढल्या खसकन्

बलरामाची दातखिळीच

बसली सवत मटकन् (४)


दादल्याला बाहेर काढला 

फरफटत घरी आणला

अद्दल घडे बलरामला

दोन बायका नकोच मला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract