करु जीवाची मुंबई...
करु जीवाची मुंबई...
करु जीवाची मुंबई... वारा, पाऊस, गारवा मन नाचतया थुईथुई, आरे चला रे दोस्तांनो करु जीवाची मुंबई... भर उन्हाळ्यात पाऊस आहे आपल्या संगतीला, पाणीच पाणी,पूर कसा समुद्र खवळला... वाळूत लोळू या मन भिजून चिंब होई...१ पाहून सागरास भरती दर्या मनाचा उफाळला, वाऱ्या,पावसात भिजू या खरा आनंद भेटला... मस्ती कराया मन हे आज आतूर होई...२ बिच, चौपाटीवर मजा, धमाल करु, लैला मजनूच्या संगतीने वय आपलं ही विसरु... नेत्रसुख मिळून घालमेल मनाची होई...३ गगनचुंबी इमारती ही कुबेराची वस्ती, पाहू माणूस आहे का नुसती हैवान मस्ती... आपलं सुखाच सपन पाहून च पूर्ण होई...४ लई होती हौस एकदा मुंबई पहायची, ही गरीबी विसरून लई श्रीमंत व्हायची... मला आठवती आज आपले बाप आई...५ जीव गर्दीत गुदमरला इथे कोणी नाही आपला, रात्रंदिन राबती कोणी उपाशीच झोपला... गड्या आपुला गाव बरा मन तिकडे धाव घेई...६ नाही गरीबांना थारा नाही गरीबांची मुंबई, सारा पैशाचा बाजार पैशासाठी सारं काही... तो पैशाचा माज हाल गरीबांचं होई...७ गरीब श्रीमंतीची दरी दिसे मुंबईत फार, शोषण, लाचारी भरला देहबाजार ... नाही पत्ता जगण्याचा झोप डोळा न येई....८ गायकवाड आर.जी.दापकेकर
