STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational Others

3  

Priti Dabade

Inspirational Others

कृतघ्नता

कृतघ्नता

1 min
379

अंगी असावा कृतज्ञतेचा भाव

तेव्हाच होई जगी चांगले नाव


कृतज्ञ करी कळत नकळत उपकार

सदैव फेडत राही परोपकार


नसे उपकाराची जाण

कृतघ्न विसरी कृतज्ञतेचे भान


कृतघ्न बनी चिंतेचा विषय

समजत नाही कुठलाच आशय


माणूस असे समाजप्रिय व्यक्ती

कसे चालेल बाळगून कृतघ्नतेची नीती


कृतघ्न जाणी फक्त गोड बोलायचे

कळे कसे काम करून घ्यायचे


कृतघ्न म्हणजे लबाड, मतलबी

मिरवीत फिरे जगात खोटी छबी


प्रत्येक गोष्टीत असते सौंदर्य

काम झाले तरी टिकवावे औदार्य


आईवडिलांची करावी सेवा निरंतर

कृतघ्न होऊन देऊ नये अंतर


कृतघ्नतेवर वेळीच आळा घालावा

सदाचाराचा नेहमीच अवलंब करावा


प्रत्येक कृतीत दिसावी दया, कृतज्ञता

कपटी भाव, असू नये कृतघ्नता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational