STORYMIRROR

Monali Kirane

Inspirational

3  

Monali Kirane

Inspirational

करोना

करोना

1 min
182

करोनाची महामारी दाखवते मानवाची उत्क्रांती,

खातात सरणावरची पोळी, पाहून कुंठीत होते मती!


पशुवत वर्तती कोणी, खाती मढ्याच्या टाळूवरचं लोणी.

माणसांच्या स्वार्थीपणाच्या परीसीमेची कहाणी!


निरपेक्ष सेवा, अन्नदान करून देवत्वा पोचले काही,

स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही!


जीवनदायी प्राणवायू झालाय सोन्याहूनही महाग,

काय सांगता किती भक्ष्य घेऊन शमेल ही आग!


जन्मदात्यांस रस्त्यात टाकून पळून जाती मुले,

लोप पावलेल्या माणुसकीचे प्रदर्शन खुले!


स्वतःला माणूस म्हणणाऱ्यांनो आतातरी जागे व्हा,

करोनाचा नायनाट करण्या संघटीतपणे उभे रहा!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational