STORYMIRROR

Mrudula Raje

Inspirational

4  

Mrudula Raje

Inspirational

क्रिकेटप्रेमी भारत देश

क्रिकेटप्रेमी भारत देश

1 min
239

देश माझा आहे चाहता क्रिकेटचा।

विरुध्द टीमच्या पडणा-या विकेटचा॥


" टेस्ट मॅच" असो, की असो" वन डे" खेळ तो।

देश माझा क्रिकेटच्या रंगामध्ये रंगतो॥


देव मानतो आम्ही गावस्कर, सचिनला।

विक्रमांचे उच्चांक मोजीत, पूजतो क्रिकेटला॥


खेळ जरी आला असे हा, ब्रिटिशांकडून आमच्याकडे।

इंग्रजी टीमचा धुव्वा उडवावा, हेच देवाला साकडे॥


पाकिस्तानी खेळाडूंना देऊन धक्का पराभवाचा।

नाचतो बेभान आनंदे,देश माझा चाहता क्रिकेटचा॥


धर्म-पंथ विसरून अवघे, चर्चा रंगते बहुमुखी।

फोडितो फटाके विजयाचे, आनंदे विहरतो कौतुकी॥


स्त्री-पुरुष, बालक- वृध्द, हा भेद नसे ह्या आनंदवेळी।

मांगल्याचा क्षण मानतो आम्ही, जिंकता क्रिकेटची खेळी॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational