क्रांतिज्योती ज्ञानज्योती
क्रांतिज्योती ज्ञानज्योती
साताऱ्यात जन्मली
कन्या होती नेवसेंची
विवाह बद्ध होऊनी
झाली स्नुषा फुलेंची ||१||
खरा जीवन प्रवास माईंचा
येथूनच सुरू झाला
दगड धोंडे शेण झेलून
शिक्षणाचा ध्यास घेतला ||२||
मुक्त केले स्त्री शक्तीला
अंधारातून प्रकाशाकडे नेले
अज्ञानांना ज्ञानी बनवून
भविष्य स्त्रियांचे घडले ||३||
प्लेगची साथ आली
रुग्णांची सेवा केली
जोतिबांच्या साथीने
अत्याचारांशी लढली ||४||
नाही मानली जात पात
सर्वांना शिक्षण दिले समान
क्रांतिज्योती, ज्ञानज्योती
कार्य केलेस खूप महान ||५||