STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Tragedy

3  

अमोल धों सुर्यवंशी

Tragedy

क्रांतीकारी वीरांच्या देशात....

क्रांतीकारी वीरांच्या देशात....

1 min
281

क्रांतीकारी वीरांच्या देशात, 

अत्याचारी माजलेत.

मुळा पासून छाटून टाका 

लागलेली कीड आहे ही समाजाला

कोर्ट कचेरी नको सरळ ठोका.


सुरक्षेची हमी देणारा रक्षक 

मदार्याच्या खेळातील माकड बनलेत 

क्रांतीकारी वीरांच्या  देशात 

अत्याचारी फोपवलेत 


पिढीतेच्या बाजूने सोशलमीडिया, 

वर तर सारेच आई बाप झालेत.

तिच्या आयुष्य भराच्या काळोख्यात.

दोनचं दिवस तिच्या बाजूने, 

हमदर्दीच्या, चांदण्या चमकतात.

समाज दुःखाची खोटी हवा करतो 

क्रांतीकारी वीरांच्या देशात, 

स्त्रीलाचं दुर्बल समजतो. 


सारेचं खरे देश भक्त म्हणे, 

पुन्हा बलात्कार घटना कशा काय घडतात??

या देशात अत्याचारी वाचतात

पण सैनिक सीमेवर रोज मरतात 

बलिदानी देशात अत्याचारी भरलेत.


अंतकरणात क्रांतीची मशाल विजते, 

बलात्कार नंतर रस्त्यावर मेणबत्ती पेटते, 

क्रांतीकारी वीरानच्या देशात, 

समाजकारणी झोपा काढतायत

निषेध करून खोटा पणा लपवतायत. 


कवितेच्या माध्यमातून सांत्वन करतोय किंवा

मी कोणी स्त्रीवादी आहे अस काही नाही.

एकचं सांगणं.. 

 तुम्ही लढावं.. 

न्याय हा न्यायालयात पोहचण्याच्या आधी मिळवा.

कोणत्याही पद्धतीने  

तेव्हा डोळे उघडतील न्याय देवतेचे.... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy