कोऱ्या पाटीवर नशिबाचे अक्षर
कोऱ्या पाटीवर नशिबाचे अक्षर
गाडा हाकताना संसाराचा
चाक गतीचे मीच असताना
आजवर मिळाले काय मला
सारखे विचारु नको मना
आहेत सुख आणि दुःख
एकाच नाण्याच्या दोन बाजू
मौल्य आपले समजविण्या
झुलवितात प्रारब्धाचा तराजू
नव्हते काहीच पूर्वनियोजित
झाला समजण्यास उशीर
दुभंगली कित्येक स्वप्ने तुझी
ध्येय राहीले मात्र पैलतीर
आर्तसाद ती ऐकून ईश्वर
अवघी चिंता सोबत नेईल
फुलविण्या कमलपंखुडीनी
दिवस तुझा देखील येईल
भरकटलेल्या मनस्थितीचा
नको आता उगी गलगला
फेकून दे कात काळोखी
धैर्याने पुढे जायचंय तुला
उमजले निमित्त अपयशाचे
बहरत्या आयुष्याच्या उतरंडीवर
कर्तृत्वाच्या लेखणीने लिह ...
कोऱ्या पाटीवर नशिबाचे अक्षर
