STORYMIRROR

Rajan Jadhav

Action

4  

Rajan Jadhav

Action

बापाचा स्टेटस

बापाचा स्टेटस

1 min
12

बापाचा स्टेटस 


चारचौघात जरा बसला काय!

बापाच्या स्टेटसची वाटते लाज 

पूर्वी गावकुसाबाहेर फेकलेला 

तुला एवढा आला कुठून माज?


जातीअंताच्या लढ्यात एकटा

मनूवाद्यांशी लढला होता बाप

इतिहासाची पाने  चाळून  बघ

अकल्पितेने उडेल  थरकाप!!


जनावरातून ज्यानं  माणसात

आणलं, मोठा साहेब  बनवलं 

दरिद्री दिवस  संपवण्या  तुझे

प्रारब्धास अपराजेय थकवलं


देव-धर्म,पूजा-अर्चाचे स्वातंत्र्य

व्यक्तीगत  मिळणारा  सन्मान

आवडती भाषा शिक्षण उद्योग

देणारे बापानेच दिले संविधान


जात  दडवण्यासाठी  बापाला

झुगारलं तरी नाही पडत फरक 

ना धरेवरच त्या नभोमंडळातही 

बापाचे नाव आहे अजून कडक!

 

तुझ्यापेक्षा जातीबाहेरचा बरा

पूर्वजकर्माने भासतो  लंच्छित 

बापाबद्दल  त्याच्याही हृदयात 

आदराचे स्थान दिसते किंचित

----------------------------------------

✍️ राजन जाधव

       मठ-वेंगुर्ला

       सिंधुदुर्ग

       9763206782


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action