STORYMIRROR

Rajan Jadhav

Inspirational

4  

Rajan Jadhav

Inspirational

भीमजयंती येईपर्यंत....

भीमजयंती येईपर्यंत....

1 min
17

भीमजयंती येईपर्यंत....


गणपती दुर्गोत्सवात नाचलो

एकत्र  घालून गळ्यात गळा 

बाटगे-बौध्द   बौद्धेत्तरांमध्ये 

जणू बंधुत्वाचा फुलला मळा 


मौज  मजेसाठी  मूर्तीसमोर

नाचणं वाटल  लयच  भारी

प्रश्न पडला बौद्धेत्तरांना मग

बाटग्यांची पाहून अदाकारी


वयस्क अबालवृद्ध गहिवरले

भावकीतील पाहून प्रेममाया

अखेर संघटित झालो,आता

चालेल चितेवर गेलेली काया


सर्वानी  दिली   भीम वंदना

मिळून महापरीनिर्वाण दिनी 

नाच  गाण्याचा सण नव्हता 

लाज जनाची बाळगली मनी


गप्पा, थट्टा- मस्करी  हळूच

विचारपूसही   झाली  कमी

बौद्धेत्तरांपासून बाटगे लपवू  

नाही शकले आपली उधमी


भीमजयंती संपेपर्यंत आता

साप मुंगुसाची गट्टी धरायची

जयंती आटोपल्यावर मात्र

भावकीशी  नाती जपायची

----------------------------------------

✍️  राजन जाधव

       मठ-वेंगुर्ला

       सिंधुदुर्ग

       9763206782

टीप...

 बाटगे-बौद्ध-

       जे केवळ कागदोपत्री बौद्ध आहेत परंतु बुद्धाच्या मूळ शिकवणुकीशी त्यांना काहीच देण घेणं नाही *.(याला काही अपवाद असतील यात शंका नाही )* 

 बौद्धेत्तर -

       ज्यांनी धम्म दिक्षा घेतलेली नसून..., आहेत त्या पुर्वाश्रमीच्या जातीतून बाबासाहेबांच्या   सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक विचारांशी देण घेणं ठेवतात.भौतिक जीवन नैतिक मार्गाने जगतात (याला बहुसंख्यने अपवाद असतील) असा अर्थबोध घेणे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational