प्रियदर्शी सम्राट अशोक
प्रियदर्शी सम्राट अशोक
प्रियदर्शी सम्राट अशोक
*********************
मौर्य सम्राज्याचा तृतीय सम्राट
माता सुभद्रांगी पिता बिंदूसार
पोटी शोभला तल्लख बुद्धीचा
युद्धकुशल अशोक कर्तबगार
उभारिली तेवीस विद्यापीठे
तक्षशिला नालंदा कुंदाहार
प्राण्यांस पशुवैद्यकिय गृह
ग्रेड रोड वाहतूक साभार
एकहाती सत्ता त्याची भूतान
श्रीलंका आफगाणिस्तान
ना भूतो ना भविष्यति शौर्य
चक्रवर्तीचे गरजे हिंदुस्थान
राजेशाही चिन्ह अशोक चक्र
राष्ट्रध्वजाचा वाढविते सन्मान
शाही निशाण चत्तृर्मुखी सिंह
राष्ट्रीय चिन्हाचे देई योगदान
सत्य अहिंसा प्रेम बंधुता
मूल्यांचा निष्ठावंत उपासक
वैभवशाली कारकिर्दीत
स्वर्णकाळ देणारा प्रशासक
धम्म प्रसारासाठी 84 हजार
बुद्धस्तूप विश्वभर उभारून
बुद्ध अनुवर्तण्याचा संदेश
दिला तलवार झिडकारून
शौर्यापुढे ज्याच्या जगजेत्या
सिकंदराचेही झाले पार्श्वगमन
त्या महान देवनांम प्रिय सम्राट
अशोकास कोटी कोटी नमन
------------------------------------
✍️राजन जाधव
मठ - वेंगुर्ला
सिंधुदुर्ग
9763206782
