श्रीराम उरु दे अंतरात....
श्रीराम उरु दे अंतरात....
सर्व हनुमान भक्तांना श्री हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏🙏🙏
श्रीराम उरु दे अंतरात....
----------------------------------
हे मारुतीराया वीर हनुमंता
शक्ती भक्ती युक्तीच्या संगमा
तुझिया चरणी टेकिता माथा
नाश पावती गर्व अहंपणा
शोषित वंचित दुरितांचे दुःख
हरण्यासाठी लाभो सर्व बळ
सकामी संकटाचा वर्षाव होता
पाठीशी राहून करावे निष्फळ
सत्यार्थाने मार्गक्रमण करिता
असत्याचे सामर्थ्य पडो गळून
सचोटीस परिक्रमा घालताना
भयादी अपयश जावो जळून
परत्पाराशी निरंतर भक्तनिका
कर्तव्य परायणता ही सर्वश्रेष्ठ
सत्कार्य आरंभता कोणतेही
तुझ्यासम व्हावे मी एकनिष्ठ
सूडबुद्धी क्रोध मोह मत्सर
मनुष्य जातीशी अपार घातक
तया नादी उत्पादाने न घडो
मानवता धर्मासी नीच पातक
पुत्रपौत्र ऐश्वर्ययुक्त भौतिकास
प्रत्यये येता समृद्धी जीवनात
मिथ्या सुखांच्या विस्मरणात
श्रीराम उरु दे अंतिमत: अंतरात
---------------------------------------
✍🏼 राजन जाधव
मठ -वेंगुर्ला
सिंधुदुर्ग
9763206782
