STORYMIRROR

Rajan Jadhav

Inspirational

4  

Rajan Jadhav

Inspirational

कागदावरचा बुद्ध..!

कागदावरचा बुद्ध..!

1 min
5

कागदावरचा बुद्ध

===============

नको नको  कागदावरचा 

क्षणिकवादी बुद्ध मजला 

अनुयायी म्हणवणारा दा 

कागदावरच बघ निजला


शिक्षित दीक्षित  होण्याने 

अशिक्षित दीक्षित  झाला

धम्म अध्ययन आभावाने

अपकीर्तीचा मध्य  ठरला


कधी  स्वार्थासाठी, कधी 

दुसऱ्याला लेखण्या कमी

बुद्ध बोधाची कुठेच नाही 

वर्तणुकीतून दिसली हमी 


नाही आर्यसत्य उमजली 

ना पंचशीलाचरणं घडले 

पांढऱ्या शुभ्र पोशाखात 

सर्व सोयीस्करपणे दडले


इतर  धर्मांचे  सणउत्सव 

कुचेष्टेचे   विषय    बनले 

माणुसकी   धर्माचे  तत्व 

सारे  मलिनतेने    सजले


रूप रंग पद पैसा प्रतिष्ठा

अनित्य!वदली बुद्धवाणी 

अनात्मामुळे जीवनशैली

झाली आलोचनांची धनी


गदारोळ  पाहून  सगळा 

सुशिक्षिताने  अभ्यासला

बुद्ध आणि त्यांचा  धम्म 

बा-भीमाने.,सांगितलेला 


प्रतित्यसमुत्पाद.,कळला

तोच  खरा  धम्म  जगला 

अधम्माच्या    सहवासात

बुद्धाचा सधम्मही  धगला

 

मग.!धम्माचा  मतीतार्थ 

त्याला आपसूक कळला 

भौतिक  जीवन   केवळ

नैतिकतेने   जगण्यातला 


नको  नको  कागदावरचा 

क्षणिकवादी  बुद्ध मजला

हवा बुद्ध,धम्मआणि संघ 

बा-भीमाने...सांगितलेला 

---------------------------------

✍️ राजन जाधव 

       मठ - वेंगुर्ला 

       सिंधुदुर्ग 

       9763206782


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational