कोरोनाचे बंधन
कोरोनाचे बंधन
कमी झाली पाहुणे रावळी
गप्पांची मैफिल संपली
एकमेकांच्या टाळ्या आनंदाने ना पडे
विचारांच्या आदलाबदलींचे ना सुटे कोडे
भांडण-तंटे दिसे ना आज कोठे
कोरोनाचे पहा फायदे तोटे
हवा झाली शुद्ध निर्मळ
रस्ते ही चकचकीत विना मळ
माणूस जरी असला घरात
पशुपक्षी उपभोगे जीवन आनंदात
प्रदूषणाचे धोके झाले कमी
स्वच्छ नद्या सर्वत्र पाऊस पाणी
जरी कोरोनामुळे आहे बंधन
तरी जीवन झाले आनंदवन
