STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract

कोरोना..

कोरोना..

1 min
188

म्हणे 'कोरोनाने' त्याचा मृत्यू झाला

चार जण भेटेनात खांदा द्यायला.


आई-बाप पडले होते धरणीला

बायको गेली होती माहेराला.


मुलंबाळं भित होते जवळ जायला

भाऊ बहिण नव्हतं कोणीच तयार पहायला.


काका,नाना, दादा, बाबा लागले दुरुनच बघायला

उचला, घाला,जाळा,पुरा,लागला गाव करायला.


गावभर चालला गोंधळ, नव्हतं प्रत्यक्ष कोणीच करायला

काही सुचेना कोणाला अंधार लागला पडायला.


धोतरातच त्यानं हागलं मुतलं होतं

त्याचा वास घेत आलं एक मोठं कुत्र तिथं.


ओढीत नेलं तसेच त्याला कत्र्यानं मसनात

देव पावला म्हणून खुशी पसरली गावात.


गावचा पाटील होता हुशार लई

म्हणाला गावाला करा आता घाई.


रॉकेल, पेट्रोल टाकून जाळा घाबरायचे नाही

सरपंच गावचा पाटलाला साथ सारी देई.


रॉकेल, पेट्रोल टाकून त्याला लावली मोठी आग

बसता चटके जाळांचे आली त्याला जाग.


वेडा होता गाव म्हणे कळलंच गावाला नाही

मेला नव्हता तो म्हणे दारु पिली होती लई.


उठून, ओरडत पळत सुटला,झाली भागंभाग

बघतो साऱ्या गावची म्हणे आला त्याला राग.


भूत.भूत..म्हणत सारा गाव पळत सुटला

जो जो त्याला भेटला,तो कोणीच नाही वाचला.


अजून ही नाही गावात त्या यायची कुणाची हिंमत

बघा कोरोनाचं नावं आणि दारोडयाची गंमत...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract