Revolutionize India's governance. Click now to secure 'Factory Resets of Governance Rules'—A business plan for a healthy and robust democracy, with a potential to reduce taxes.
Revolutionize India's governance. Click now to secure 'Factory Resets of Governance Rules'—A business plan for a healthy and robust democracy, with a potential to reduce taxes.

DrGAURI PATIL

Inspirational

3  

DrGAURI PATIL

Inspirational

कोरोना काव्य...

कोरोना काव्य...

2 mins
25


।।श्री।।

LOCK DOWN चं कोडं कसं सोडवायचं

तारीख पे तारीख म्हणत

मार्गस्थ व्हायचं

CORONA (COVID_19) तू जितका जीवघेणा विषाणू....

तेवढीच वाढविलास तू विश्वातील सहिष्णु...


CORONA (COVID _19) तू म्हणजे मानवाच्या चुकांना देवाने दिलेली शिक्षा.....

आता विश्वातील मनुष्य करतोय आपल्याच चुकांची समीक्षा...

LOCK DOWNच्या काळात आम्ही स्त्रियांनी घरपण जपलं...

आजी आणि आईप्रमाणेच संस्कारांना पुढील पिढीत रुजवलं...


दुरावलेली नाती आणिक घट्ट झाली....

नात्यांनाही जरा प्रेमाची ऊब मिळाली....

मैत्री असो वा नातीगोती सर्वांचेच महत्त्व गेले समजावून....

अशाश्वत जीवनात मानवता, कर्म आणि मैत्री यासम शाश्वत नाही हे दिलेस पटवून...


परदेशी बाबू CORONA (COVID_19)तू आहेस आमच्या नावडत्या देशाचा....

मूळात तू आमच्याच नावडीचा...

क्रोध होतोय अनावर आता तुझ्या वरचा...

कारण तू तर आहेस त्या क्रूर चीनचा...


क्रोध येतोय समाजातील नकारार्थी मानसिकतेचा आणि नको त्या राजकारणाचा.....

जिथे कशाचीच ददाद नाही त्यांना तुझ्यामुळे होणाऱ्या परिणामांच्या झळा जास्त पोहोचणार नाहीत!

गरजवंताला तुझ्या असण्याने कमीतकमी दोन घास सहज भेटत आहेत.....!!

मानवासाठीच मानव आज झटतो आहे...


CORONA (COVID_19) तू घराला घरपण देणारा ठरलास जरी...

तुझ्यामुळे झालेली अपरिमित हानी... हकनाक गेलेले मनुष्यांचे बळी.... मी कधीच विसरणार नाही....

वाईटातून चांगले घडावे... तू एकदाचा माझ्या देशातून एव्हाना या पृथ्वीतलावरुन कायमचे निघून जावे....

मनुष्याने चुकीच्या प्रायश्चित्तांतून शिकत जावे....


पुन्हा एकदा त्या श्री शेषनागांनी पृथेचा भार तसाच उचलावा.... हे ईश्वरा...

धरतीवर पुन्हा बरसू दे तुझ्या कृपेच्या श्रावण सरी....

आषाढी वारी, गौरी-गणपतीची चाहूल मजला अस्वस्थ करी...

उठ श्री हरि तू विटेवरूनी....

हो कर्दनकाळ या कोरोनाचा(CORONA,COVID_19)...


तुझा वारकरी शेतकरी, आस लावूनी गगनाकडे...

मुबलक पावसाचे घालतो तुला साकडे...

हे बुद्धी विधाता, श्री गणराया... तुझ्या स्वागतार्ह भक्तांचे नयन लागले तुझ्या मंदिरी...

का कोपलीस गं माय जगदंबे, तुझ्या नवरात्रीची मजला जडते प्रिती....


हे श्रीकृष्णा संभवामी युगे युगेची आलीये आता घडी...

त्राही माम म्हणतोय मानव तू त्यास आता या संकटातूनी निवार....

हे परमेश्वरा साष्टांग दंडवत तूज त्रिवार...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational