STORYMIRROR

Rahul Salve

Inspirational

3  

Rahul Salve

Inspirational

कोरोना जनजागृती

कोरोना जनजागृती

1 min
219

सारे आता गुमान 

बसा लोकहो घरात

हाहाकार उडालाय

कोरोनाचा जगात


डॉक्टर, पोलीस, नर्स

सार शासकीय प्रशासन

झटतायेत तुमच्यासाठी

करून तन मन धन


गल्ल्याबोळात आता

नका सारखं फिरु

कोरोना अंगणात तुमच्या

लागलाय भिरभिरू


काळजी घ्या सारे

हात धुवा,मास्क लावा

शासनाचा आदेश पाळा

तेव्हाच बसेल कोरोनाला आळा


कोरोना व्हायरस टपून आहे

करायला आपल्यावर घात

घरात बसूनच आपण

करूया त्यावर जोरात मात


शहरातील सारे लागली गावाकडे पळू

स्वच्छतेचं महत्व लागलं आता कळू

देशासाठी आता थांबा थोडं घरी

सारे मिळूनी कोरोनाला परतवून माघारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational