कोरड्या जखमांवर
कोरड्या जखमांवर
ओल्या कोरड्या जखमांवर
कशाला लावतेस लेप चंदनाचा
नाही भरणार जखम मनाची
कशाला भडिमार वरवरचा
सोसायचे ते सोसतो आहे
उगाच फुंकर मारू नकोस
वरवरची फोल सहानुभूती
उगाच डंका पिटू नकोस
नाही सोसवत खोटेपणा
परखड मुक्ताफळे बोलतो
दिखाव्याचा बोलपट ऐकता
दूसऱ्या वाटेने मी चालतो