STORYMIRROR

Sanjay Gurav

Romance

3  

Sanjay Gurav

Romance

कॉफी आणि...

कॉफी आणि...

1 min
61

छान जमून यायची तेव्हा

तिथल्या कॅफेतली... कॉफी

तुला पाहता यायचे जाताना

तेवढेच सध्या होते गं काफी.


वाटायचे अजून रंगत का नाही

डार्क रंगाची वाफाळलेली चव

इतका करायचे मन तुझा विचार

गुलाबी हवेत जमायचे केसात दव


पहिल्यांदा "हो" म्हणालीस कॉफीला

मी कॉफी तेव्हा चक्क पिलीच नाही

वाफेची वलये हृदयाकार बनायची

इशारे करायचीत गं काहीच्या काही


दोघे असताना माहितीय ना आपल्यात

घोटा घोटाने ओठी कॉफीच खुलायची

तुझी नजर माझ्या कपावर खिळलेली

तुझ्या मनातलं मात्र कॉफीच बोलायची


आजही ओठांवर तीच चव, खोटे नाही

तिला मात्र अजिबात कॉफी चालत नाही

माझ्या सवयीबद्दल ती अनभिज्ञच राही

पुन्हा पुन्हा आठवते, कॉफी आणि बरेच काही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance