कोणीतरी हळूच यावं
कोणीतरी हळूच यावं
कधीतरी कोणीतरी
हळूच यावं
अलगद मला मग
मिठीत घ्यावं || 0 ||
भावना माझ्या
तिला कळाव्या
व्यथा मनातील
साऱ्या गळाव्या
हृदयाला माझ्या
स्पर्शुन जावं
अलगद मला मग
मिठीत घ्यावं || 1 ||
मन माझं तिला
वाचता येईल
आणि मला
कवेत घेईल
मनातील प्रेम
हळूच वाचावं
अलगद मला मग
मिठीत घ्यावं || 2 ||
उंची प्रेमाची
वाढत जाईल
प्रभाव माझ्यावर
पाडत जाईल
सुखाच्या उत्तुंग
शिखरावर न्यावं
अलगद मला मग
मिठीत घ्यावं || 3 ||