कोणीच कसं बोलत नाही
कोणीच कसं बोलत नाही
ज्यांना आम्ही खुर्चीवर बसवले
तेच आमच्यासाठी कसे शाप झाले ?
हुकूमशाही का म्हणून ? हा कुठला न्याय
शेतकरी , कामगार , विद्यार्थी रसत्यावर
एवढे कसे आम्ही संवेदनाहीन मुर्दाड झालोय
संपलीय आमच्यातील माणुसकी , प्रेम , करुणा
कुठे गेलीत ती माणसे जीवाला जीव देणारी
अन्याय , अत्याचाराविरुद्ध पेटून उठणारी
बलात्कार , लूटमार , काळाबाजार बोकाळला
खुर्चीतला संधीसाधू बगळा विनाकारण चेकाळला
त्यांच्या पापात सहभागी जे कोणी लाल झाले
हिशोब करील जनताच योग्य वेळ आल्यावर
निरपराधाना जेल , अपराध्यांना धाक नाही
इरादा त्यांचा पाक नाही ,एवढं सारं घडताना
लाखो लोक मरताना ,महागाई वाढताना
बघत बसलोय आम्ही फक्त तमाशा ?
विकली गेली असतील काही पण
बाकीच्यांना का गाढ झोप लागलीय
हल्ली सारे कसे हवालदिल निराश
कोणीच कसं बोलत नाही ?
