कोकणची माणसं
कोकणची माणसं
कोकणच्या भूमीतली
लई साधी ही माणसं
माणुसकी नित्य त्यांच्या
हृदयामधीच वसं
साधीभोळी सर्वांलागी
मदतीला लगोलगी
रात्री अपरात्री जाई
माया नित्य वसे मनी
कुणी भेटता लबाड
असे सडेतोड जाण
उत्तराला प्रत्युत्तर
भीडभाड नाही कोण
असे काळीज प्रेमाचे
खाऊ घाले अतिथीस
चार दिन आग्रहास
प्रेमे ठेवी रहायास
गोड खाऊ घालतील
गप्पागोष्टी करतील
मौजमजा सांगतील
रात्री भुते दावतील
मनी कावा कधी नाही
मन हो शहाळ्यावाणी
हेवा दावा ना कुणाचा
शांत आणि गोड वाणी
