STORYMIRROR

UMA PATIL

Inspirational

4  

UMA PATIL

Inspirational

कोजागिरीचा चंद्र आणि तू...

कोजागिरीचा चंद्र आणि तू...

1 min
28.1K


कोजागिरीचा चंद्र जास्त

सुंदर आहे की तू ?

हे मी ठरवू शकत नाहीये...



तुझा तेजस्वी चेहरा

आणि

त्या चंद्राचा तेजस्वी प्रकाश

यांच्यापैकी कोण जास्त

प्रकाशमान आहे...

हे मी कसं ठरवू ?



तो चंद्र माझ्यापासून कित्येक

करोडो किलोमीटर दूर आहे,

तरी तो माझ्या डोळ्यांना दिसतो...

तू माझ्यापासून

काही किलोमीटर दूर आहेस,

तरी तू माझ्या डोळ्यांना

दिसत नाहीस...

तुमच्या दोघांपैकी कोण जास्त

दूर आहे ?

आणि....

कोण जास्त जवळ आहे ?

हे मी कसं ठरवू ?



जाऊ दे...

या ठरवण्या-बिरवण्याच्या भानगडीत

पडण्यापेक्षा...

त्या चंद्रातच

मी तुला बघून घेते, राजसा...



चंद्राचा तेजस्वी प्रकाश म्हणजे,

तुझा चेहरा...

चंद्राची शीतलता म्हणजे,

तुझी उबदार मिठी...



माझं तुझ्यावर प्रेम आहे...

हे कळण्यासाठी एवढेच पुरावे

पुरेसे आहेत ना....!

तुझ्यापर्यंत या गोष्टी पोहोचतील,

तेव्हा मनाला शांतता मिळेल...

राजसा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational