STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

कळला रशियाला

कळला रशियाला

1 min
248

सोन्याची पारख 

नसते प्रत्येकाला,

माझा अण्णा भाऊ

 अजरामर झाला,

नाही कळला भारताला

तो कळला त्या रशियाला...


अण्णा भाऊ म्हणजेच

खरं एक नंबरी सोनं,

किर्ती त्यांची महान

किती गाऊ गुणगान,

कसा झाला साहित्यिक

तो प्रश्न पडला हा जगाला....


दिड दिवसांची त्यांनी

शिकुनीया शाळा,

फुलविला अण्णांनी

साहित्याचा मळा,

जगातील आठवे आश्चर्य

लोक म्हणती अण्णाला....


लेखणीला त्यांच्या

तलवारीची धार,

अन्यायावर खरा

केला त्यांनी वार,

असा महान लोकशाहीर

नाही होणार ना झाला....


कथा, कादंबऱ्या,नाटकं

पोवाडे, लावण्या, गिते,

देशोदेशी जगभर झाले

अण्णा भाऊंचे साहित्य 

मिळाला अण्णा हिरा 

चित्रपटसृष्टीला....


अण्णा भाऊ होता

खरा कामगार नेता,

स्वातंत्र्य सेनानी,निर्माता

चित्रपट अभिनेता,

बोलावून रशियाने मोठा

गौरव अण्णांचा केला....


उच्च जातीत नव्हते

जन्मले अण्णा भाऊ,

म्हणून त्यांच्यावर हा

अन्याय लागला होऊ,

देणार कधी हे शासन

भारतरत्न अण्णांला.....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract