किती वेचावा पाऊस......
किती वेचावा पाऊस......
किती वेचावा पाऊस इवल्या मुठीतुन
सारी सुखदुःख वेचावी जशी जगातून
थोडी तुझी थोडी माझी जरी मिसळली
सुख राहु दे तुला कर दुःख वेगळी
सुखाचे थेंब सारे तुला मिळु दे सगळे
आहेत दुःखाचे जेव्हडे मला दे करून वेगळे
पाऊस वेचताना हाती किती मोती आले
काहीच ऊरले मुठीत खुप निसटून गेले
जे निसटून गेले ते माझे क्षण होते
मुठीत राहीले माझ्या ते तुझे मन होते.
पाऊस वेचताना किती गलबलून आले
जुन्या आठवणी सार्या जसे आभाळ भरले.
पाऊस वेचताना सारे भरून पावले
ओल्या मातीच्या गंधात मन धुंद झाले
तन न्हाऊन निघाले किती दडवावा हुंदका
मनी दगा देतातच हे डोळे
तुझ्या येण्याने जगणे नव्याने सुरू झाले
वैशाख वणवा सरूनि जीवन ऊमलून आले
कीतीही वेचला पाऊस हाथ रीताच राहीला
कितीदा मोडला डाव पुन्हा पुन्हा मांडला.
पुन्हा पुन्हा मोडला.
