STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

किती पदर मायेचे!!

किती पदर मायेचे!!

1 min
251

मायेचा पदर

जन्मतःच मिळे

ऊर माऊलीचा

वात्सल्य निथळे  (१)


मायेचा पदर

बहीण धाकटी

भारी पितांबर

भाऊरायासाठी   (२)


मायेचा पदर

शेजीबाई देते

अडल्या वेळेला

मदतीस येते     (३)


मायेचा पदर

सासूबाई देई

सांभाळी सूनेला

लेक समजूनी    (४)


मायेचा पदर

लेक मायबापा

आधार तयांना

देई प्रेम माया     (५)


मायेचा पदर

गुरुमाऊलींचा

ज्ञानदान देई

देई प्रेम माया    (६)


मायेचा पदर

देवीमाता धरे

संकटात येते

धावूनिया त्वरे     (७)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract