STORYMIRROR

Tejaswita Vengrlekar

Inspirational

3  

Tejaswita Vengrlekar

Inspirational

किर्तीसुगंध

किर्तीसुगंध

1 min
361

मिळतो आपणास एकदाच

सुंदर असा जन्म मानवाचा

सद्विचारांची धरुनी कास

फुलवू मळा जीवनी प्रेमाचा


दैवी वरदान असे हे जीवन

सत्कार्याला लावू प्रत्येक क्षण

वाणी आपली असावी नम्र

दुखू नये कधी कोणाचे मन


सहकार्याला असावा हात पुढे

दुःखी पीडितांना मदत करावी

आपल्या छोट्या छोट्या कार्यातून

प्रतिमा आपली उजळत जावी


आस्वाद जीवनाचा घ्यावा असा

नाव आपले सर्वांमुखी असावे

जेव्हा जेव्हा घडतील स्तकर्मे जगी

लोकांनी आपले नाम स्मरावे


मार्ग अंगीकारावा सत्याचा नेहमी

दुर्गुणांचा नको स्पर्शही मनास

निसर्गाविषयी असावे प्रेम हृदयी

हातभार सदा पर्यावरण विकासास


निर्मळ, निरागस फुलांसारखे जीवन

सर्वांना सुगंधित करीत जावे

कार्य भूतलावरील संपले जरी

सुगंधित आठवणीत मनामनात राहावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational