असा एकदा पाऊस यावा
असा एकदा पाऊस यावा
1 min
195
असा एकदा पाऊस यावा
धरतीचा सुगंध रोमारोमात भरावा
पानाफुलातून पाणी ठिपकावे
असंख्य मोती जणू नभाने उधळावे
थेंबाथेंबातून कारंजे दिसावे
इंद्रधनूचे रंग नभी खुलावे
वृक्षवल्लीनी बहरून यावे
वनी मयुराने धुंद नाचावे
वसुंधरेने हिरवा शालू पांघरावा
नवीन पालविचा साज झाडांवर दिसावा
नदीनाल्यानी काठोकाठ भरावे
बळीराजाने मनी सुखवावे
शेतपिकांनी मजेत डूलावे
श्रावण झुल्यावर मस्त झुलावे
सुंदर फुले बगिच्यात उमलावी
धरती नववधु सम सजावी
कोकिळेला नवा सूर गवसावा
नवीन गीताचा आस्वाद लुटावा
सर्वत्र आनंदी उल्हास असावा
असा एकदा पाऊस यावा
