STORYMIRROR

Tejaswita Vengrlekar

Inspirational

3  

Tejaswita Vengrlekar

Inspirational

विचारांची सकारात्मकता

विचारांची सकारात्मकता

1 min
281

जीवनात मानवाच्या

सकारात्मकता हवी

येवो प्रसंग कठीण

मिळे सदा दिशा नवी


कार्य करण्यास ऊर्जा

देती प्रगल्भ विचार 

सकारात्मकता मनी

होती स्वप्नेही साकार


जीवनात नित्य येती

चढ उतार आपल्या

यश मिळविण्यासाठी

ठेवा भावना चांगल्या


खात्री बाळगा यशाची

कार्य करा उत्साहाने

राग,लोभ,द्वेष,ईर्षा

सारे जिंकावे प्रेमाने


शुद्ध विचार मनात

खुली द्वारे प्रगतीची

नाती जपता मनाने

नांदी होई समृद्धीची


देण्या स्वप्नांना भरारी

मुक्त विचार स्वीकारा

अंधश्रद्धा नको मनी

विज्ञानाची कास धरा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational