STORYMIRROR

Tejaswita Vengrlekar

Inspirational

3  

Tejaswita Vengrlekar

Inspirational

सार्थक दिवाळीचे

सार्थक दिवाळीचे

1 min
329

सण वर्षाचा असे दिवाळी

करू साजरा नव्या उत्साहाने

नेऊ उजेड गरिबांच्या झोपडीत

दिप उजळू मनाच्या प्रकाशाने


गोड भावनांचा फराळ न्यारा

रंजल्या गांजल्या व्यक्तींना देऊ

सद्विचार,सहकार्याचा एक दिवा

त्यांच्या जीवनी झगमगत ठेवू


उजळेल त्यांचे जीवन सारे

ज्ञानाची अशी ज्योत लावू

त्यांच्या पंगतीत बसून आम्ही

दिवाळीचा गोड फराळ खाऊ


फटाके,नवी वस्त्रे, अनाठायी खर्च

सर्वकाही यावर्षी वर्ज्य करूया

संकल्प करून नव्या विचारांचा

माणुसकीची दिवाळी खरी साकारूया


खुलती चेहरे जेव्हा गरिबांचे

मिळती आशिष लाखमोलाचे

येईल बहर तेव्हा शुद्ध विचारांना

सार्थक होईल दिवाळी सणाचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational