STORYMIRROR

Tejaswita Vengrlekar

Others

4  

Tejaswita Vengrlekar

Others

सृष्टीचे हिरवे सौंदर्य --मृदगंध पावसाचा

सृष्टीचे हिरवे सौंदर्य --मृदगंध पावसाचा

1 min
257

बहरून गेला निसर्ग सारा

लागली चाहूल वर्षाऋतूची

सृष्टी सजली नववधूसारखी

आस तिला त्या प्रिय सख्याची

येई पाऊसराजा वाजतगाजत

मेघांच्या अश्वावर स्वार होऊनी

हिरवा शालू नेसुनी वसुंधरा

स्वागतास सज्ज लाज लाजूनी

सृष्टीला साज चढे नवा

येता रिमझिम सरी पावसाच्या

दरवळे मृदगंध मनामनात

चहुकडे भास हिरव्या लावण्याचा

बळीराजाच्या आनंदाला नसे पारावर

समृद्धीने डूले त्याचे शेतशिवार

करुनी धनधान्याची तो सोय

जगतास द्याया नवा उभार

सुखावले प्राणिमात्र, आनंदले चराचर

पावसाच्या सरींनी शहारले अंग

रोमारोमात संचारे नवा आनंद

नव्या अंकुरानी सृष्टी होई दंग

झाला निसर्ग हिरवा,नभी आले इंद्रधनू

अवनीवर अवतरे दुसराच स्वर्ग जणू

रंग चढला मेहंदीला,पावसाच्या धुंद सरींनी

मृदगंध सारा मनात राहिला भरुनी

हिरवीगार शेते डोलू लागली आनंदने

शेतकरी सुखावला, कष्ट करी जोमाने

डोंगराच्या कुशीतून, जलप्रपात येई खाली

शुभ्र दुधाळल्या पाण्यात मने चिंब चिंब झाली

पावसाच्या वर्षावाने धरती लाजली

भविष्याची बीजे नवी तिच्या कुशीत रुजली

मृदगंध पसरला चौफेर चराचरात

पावसाने रुजवली नवी स्वप्ने उरात


Rate this content
Log in