तृप्त धरा
तृप्त धरा
1 min
209
दिसे रानात
आता हिरवळ
सौन्दर्य नितळ
पानांपानात
वर्षाराणीचे
मिळे वरदान
हरपते भान
वनराईचे
शालू हिरवा
पांघरे धरती
अवनी वरती
फुले ताटवा
हिरवा रंग
समृध्दीचा वसा
शृंगारच जसा
सारेच दंग
आनंदी पक्षी
खुश चराचर
पिकांना बहर
पोपटी नक्षी
सुखावे धरा
नेसे हिरवाई
मनी अपूर्वाई
तृप्त नजरा
