STORYMIRROR

Tejaswita Vengrlekar

Others

3  

Tejaswita Vengrlekar

Others

सृष्टीचे हिरवे सौंदर्य

सृष्टीचे हिरवे सौंदर्य

1 min
156

होता वर्षाऋतूचे आगमन

उमले शेतकऱ्यांच्या मुखावर हर्ष

करती पेरणी,लावणी जोमात

मागती धनधान्याने समृद्ध वर्ष

येता बहर सृष्टीला

मन आनंदाने नाचते

मज सांगेल का कोणी

धरती अशी का लाजते?

येता लाडका श्रावणमास

हर्ष होतो रे मनास

सुरू होती सणवार

शोभे अंगणी आरास

होई निसर्ग सारा हिरवा

नभी दिसे इंद्रधनू

धरतीवर अवतरे

दुसराच स्वर्ग जणू

पावसाच्या सरसर धारा

फुलविती रोमांच मनी

एकरूप झालेली मने

जाती प्रेमात न्हाऊनी

प्रेमास येई पालवी नवी

स्वप्ने नयनी सुंदर सजती

पावसाच्या पाण्यासम

नात्यानाही येई भरती

पाऊस बरसतो मनात

धरा सजे आनंदाने

येई बहर सृष्टीला

ओठी रुळे नवे गाणे

आला साज नवा

धरतीला असा

नव्या नवरीचा

साज शृंगार जसा

हिरवीगार शेते 'डोलती

आनंदाने पावसात

बळीराजा होई खुश

कष्ट उपसे जोमात

पडे सडा अंगणी

सुगंध दरवळे चोहीकडे

पारिजात फुलांचे

रूप नाजूक केवढे

डोंगराच्या कुशीतून

जलप्रपात येई खाली

बघून मनमोहक रूप

सारी सृष्टी धुंद झाली

धरती लाजते मनात

बीज अंकुरते उरात

नव्या पिकासंगे मृदगंध

दरवके मनामनात


Rate this content
Log in