किर्ती भिमाची साऱ्या जगात
किर्ती भिमाची साऱ्या जगात
किर्ती भिमाची साऱ्या जगात...
'. पुष्पाग्रज '
माझ्या श्वासात भिम
माझ्या रक्तात भिम
भिम आहे माझ्या ह्रदयात,
किती गाऊ मी गुणगान..
किर्ती भिमाची साऱ्या जगात...१
न झाला न होणार
भिमासारखा विद्वान ,
उध्दार दलितांचा केला भिमानं,
होतों हिन,दीन पशू समान,
फिटणार नाहीत
भिमाचे ते ऋण,
घटना त्यांनी लिहीली
क्रांती मोठी केली
आलो आम्ही माणसात...
किती गाऊ मी गुणगान..
किर्ती भिमाची साऱ्या जगात...२
होता अंधकार
नव्हता कोणी वाली,
दलित, बहुजनांची
हाल फार झाली,
दिले न्याय, हक्क
क्रांती भिमाने केली ,
भिमच खरा आहे आमचा वाली,
भिम जन्मा आला
आणि उध्दार केला,
लई होतो सारे अंधारात...
किती गाऊ मी गुणगान
किर्ती भिमाची साऱ्या जगात...३
कोटी कोटी माझे
आज वंदन भीमाला,
करु भिम गर्जना
जय भीम बोला,
भिम सूर्याने प्रकाश दिला
अस्पृश्यतेचा कलंक मिटविला,
असा ज्ञानी, विद्वान
भिमा सारखा महान
नाही झाला नी होणार इथं...
किती गाऊ मी गुणगान...
किर्ती भिमाची साऱ्या जगात....४
गायकवाड आर्.जी.दापकेकर
जि.नांदेड
९८३४२९८३१५
