STORYMIRROR

Ravindra Gaikwad

Inspirational

4  

Ravindra Gaikwad

Inspirational

किर्ती अण्णाची..

किर्ती अण्णाची..

1 min
54


किर्ती आहे अण्णाची,साऱ्या या जगात.

गातो मी गुणगान, माझ्या या गितात...।।१।।


अण्णा भाऊंनी हो,शाहीरी केली ,

लिहील्या कथा, कादंबऱ्या,लावणी गाजविली.

मिळविला मान,त्यांनी साहित्यात...।।२।।


दिडदिवस अणांनी, शिकूनीया शाळा,

फुलविला अण्णानी,हा साहित्य मळा,

दिले संघर्ष बळ,आम्हा ह्रदयात...।।३।।


संयुक्त महाराष्ट्र चळवळ, अण्णाभाऊंनी केली,

महाराष्ट्राला मिळवूनी,मुंबई त्यांनी दिली,

घालीला त्यांनी घाव,जग बदलण्यात...।।४।।


काँम्रेड अण्णा भाऊ, तो कामगार नेता,

शौषणाविरुध्द लढणारा,संघर्षवीर होता,

मिळविला मोठा मान,त्यांनी साहित्यात...।।५।।


अण्णा भाऊंची सांगा,गावावी किती किर्ती

म्हणे दलितांच्या हातावर,तरली आई ही धरती.

न झाला,न कोणी होणार, असा लोकशाहीर इथं...।।६।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational