STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

किनारा

किनारा

1 min
247

दर्यावर्दी मी खलाशी

बेदरकार जगतो

लाटांच्या तांडवावरी

सुखेनैव विहरतो


वारा वादळ असती

आमचे सखेसोबती

दीपस्तंभ दिशा दावी

नेई किना-यावरी


रोज किनारा खुणवी

मला सफर पुढची

साग-यातल्या जीवनी

मज आस क्षितीजाची


जीवननौकेचे सुकाणू

जगदनियंत्या हाती

जीवनसागरी लोटूनी

तोच किनारा दाखवी


प्रवासात ना ठाऊक

किती वारा नि वादळे

सदा आनंदी राहूनी

नित मार्ग आक्रमणे


आखीवरेखीव जीणे

मजला नच आवडे

वेगवेगळी आव्हाने

पेलतचि विहरणे


पूर्वसंचितानुसारे

नाव येई किनाऱ्यासी

जीवनार्थ उलगडे

सार्थकता मन्मानसी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract