खुनी खंजीर
खुनी खंजीर
तुझ्या आठवात माझे आयुष्य केव्हाच संपून गेले
स्वतःसाठी जगणे हे खरेतर आजवर राहून गले
मला दिलेल्या जखमांना मी कधीच विसरलो नाही
हृदयातील खंजीर कधीच कुणास दिसला नाही |
दिलेल्या जखमांचा मी कधी लिलाव मांडला नाही
उगाच जखमांना कधी मी कुरवाळीत बसलो नाही
काळजास माझ्या होती सवय त्या खुनी खंजीराची
काढून खंजीर बाहेर हृदयास मी विरह देणार नाही |
मी गेल्यावर काढू नका खंजीर मम हृदयातून बाहेर
वाहणारे रक्त पिण्यास टपलेत माझेच काळीज चोर
माझ्या मृत्यूचे दु:ख खचितच त्यांनाही असणार नाही
धारोष्ण ऋधीर पिण्याचे सौख्य मुळी सोडणार नाही ||
