Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suresh Kale

Tragedy

4  

Suresh Kale

Tragedy

लज्जा रक्षण

लज्जा रक्षण

1 min
246

घुंगरू पायातील माझे सत्य सांगून गेले

होते मैफिलीत मला तुम्हीच ऊभे केले |

प्रेमाच्या दुनियेत येथे लांडगेच भेटले होते

मुखवटा लावून कोणी मजला लुटून गेले |

प्रेमावर ज्याच्या मी विश्र्वास ठेवला होता

त्यानेच माझा येथे लिलाव मांडला होता |

न्याय कसा मिळेल येथे शोषीत बालिकांना

जेंव्हा न्यायासनी जेथे लुटारु बसवले होते |

एका सामान्य महिलेस न्याय कसा मिळावा

द्रौपदीस ज्यांनी येथे अपमानीत केले होते |

नाही हे द्वापारयुग कलीयुगाची काळी छाया

पदोपदी दुःशासन नाही कृष्ण प्रेमाची छाया |

आपुले लज्जा रक्षण आपणच स्वत: करावे

होऊनी काली माता दुष्टाचे निर्दालन करावे ||

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy