खरी ओळख
खरी ओळख
1 min
173
होता गोड गैरसमज माझा
मी जगास ओळखले होते
स्मशानात गेल्यावरती मज
खरे वास्तव समजले होते |
जोवर होते या कुडीत प्राण
माझे हे शरिरही सुंदर होते
जाताच या कुडीतून प्राण
येथे फक्त कलेवर उरले होते |
शोकसभा आयोजित केली
कोणी त्याच स्मशानात
त्या शोकसभेत साठी बरेच
नाईलाजाने थांबले होते |
ऐकली श्रद्धांजली सभेत
खोटी भाषणे उपस्थितांची
त्यांच्या अंतरीचे सत्य स्वरूप
मज अंतसमयी समजले होते ||
