Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suresh Kale

Tragedy

4  

Suresh Kale

Tragedy

अरुणोदय

अरुणोदय

1 min
231


दुर्दैव आमुचे मृत्यूचे राजकारण येथे कधीच संपत नाही

पेटत्या चिता दाखवणाऱ्यांना हसरे चेहरे दिसत नाहीत |

येथे कुणाला पडली नाही काळजी मरणाऱ्या माणसाची

येथे काळजी यांना सतावतेय निवडणुकीच्या निकालांची |

ऑक्सिजनची कमतरता येथे रुग्णांची चिंता बनली आहे

प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारांना ही संधी वाटत आहे |

रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा मानणारे डॉक्टर असंख्य आहेत

महामारी ही संधी समजून लुटणारी रुंग्णालये अल्प आहेत |

इंजेक्शन मिळत नाही म्हणून कुणी तडफडून मरत आहेत

बनावट इंजेक्शन विकणारे मात्र येथे मोकाट फिरत आहेत |

रुग्णसेवा करणाऱ्यांना येथे प्रसिद्धी कोणी कधी देत नाही

कारण त्यांच्या बातमी मुळे टीआरपी कुणाचा वाढत नाही |

आलं अंगावर की ढकल दुसऱ्यावर ही प्रवृत्ती वाढत आहे

आलेल्या संकटाला सामोरे जाणाऱ्या नेतृत्वाची कमी आहे |

अशी अनेक संकटे आली गेली मानव समाज टिकून आहे

चोर लुटारु लोकांपेक्षा येथे सज्जनांची संख्या जास्त आहे |

हेही दिवस निघून जातील याची आम्हा सर्वाना खात्री आहे

रात्र संपताच अरुणोदय होतो हा तर सृष्टीचा नियम आहे ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy