STORYMIRROR

Suresh Kale

Others

3  

Suresh Kale

Others

क्रौर्य

क्रौर्य

1 min
287

पाहिले होतेस का कधी दवबिंदू गोठलेले

एक धुक्याची पहाट जग शांत झोपलेले

जाणीव कुणाही नव्हती क्रुर या जगाची

लावीती ते नख गळ्यास रक्तही गोठलेले ।

ना दोष त्या जिवाचा स्त्री गर्भ जो आहे 

जग पाहण्यास तोहि तितुकाच आतूर आहे

ऊमलण्या आधी कळी ना कधी खुडावी

निसर्ग नियम हा तुम्हासही ज्ञात आहे ।

तुमच्याच रक्ताने बनलाय हा प्राणमय कोष

स्त्री गर्भ जाहला यात त्याचा काय हो दोष

या सम क्रौर्य नाही त्याचा गर्भात प्राण घेणे

आहे त्यालाही अधिकार येथे जन्मास येणे ।


Rate this content
Log in